रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र सगरोळी,नांदेड,यांच्या सल्ल्यानूसार कपाशी शेतामध्ये शंखी गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. गोगलगायी जमा करून साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग ठेवावेत.गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात.सूर्यास्तापूर्वी त्या ठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत.शेतात बांधापासून आत तंबाखू भुकटीचा 4 से.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून टाकावा.शंखी गोगलगायींचे रासायनिक व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगा.किटकनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॉम यिस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात(२०० ग्रॉम गुळ अधिक १० लिटर पाणी)१२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्दीहाईड(२.५)टक्के ५० ग्रॉम मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||