पावसाळ्यात पशुधंनाची काळजी गोठा व्यवस्थापन कसे करावे

रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र सगरोळी,नांदेड,यांच्या सल्ल्यानुसार अशी घ्या पावसाळ्यात पशुधंनाची काळजी :पावसाळ्यात पशुचा गोठा कोरडा ठेवा पावसाच्या सरी गोठ्यात येण्यापासून प्रतिबंध करा. जनावरासाठी साठवलेला चारा, कडबा,इत्यादी व्यवस्थित झाकून ठेवा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सर्व जनावरांचे जंतनाशक औषद पाजून जंतू निर्मूलन करा.पावसाळयापूर्वी कश्याचे लसीकरण करावे याबाबत माहिती सांगा पशूंचे पावसाळ्यात येणार्‍या घटसर्प,फर्‍या आणि आंत्रविषार सारख्या साथीच्या रोगापासून बचावा करिता लसीकरण करून घ्या. पावसाळ्यात गोठ्यात व परिसरात माश्या होवू नये म्हणून निंबोळी तेल ३० मिली,करंज तेल १५ मि.ली.कपडे धुण्याच्या साबनाचे पाणी १०० मि.ली. (१ लिटर)पाण्यात या प्रमाणात मिसळून दर ८ दिवसाला फवारणी करा.धन्यवाद! 

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags