रिलायन्स फाऊंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने कृषिविषयक सल्ला याप्रमाणे कपाशी पिकामध्ये फवारणी करतांना तंबाखू किंवा बिडी किंवा सिगरेट इत्यादी खाद्य पदार्थाचा सेवन करू नये. तसेच पंपाचे नोझल तोंडाने फुकू नये. किडनाशकाच्या द्रावणाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास त्वरित पाण्याने धुऊन स्वच्छ करावा. तब्येत बरोबर नसल्यास फवारणी करू नये. तसेच किटकनाशकाची विषबाधा झाल्यासारखे जाणवल्याची लक्षणे जसे चक्कर, मळमळ, अंधुक दिसणे, त्वचेची जळजळ,अशक्तपणा,डोके दुखी इत्यादी लक्षणे दिसल्यास त्वरित फवारणी काम थांबऊन साबणाने अंघोळ करून स्वच्छ टावेलाने अंग पुसावे.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||