रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी विषयक सल्ला याप्रमाणे ज्वारी पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी नत्र ५० किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात नत्र द्यावे. ज्वारी पिकावर लवकर पेरणी केलेल्या पिकामध्ये कोळपणी करून घ्यावी. ज्वारी पिकावर वाढलेल्या आद्रतेमुळे व ढगाळ हवामानामुळे पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी पिकावर २५ टक्के प्रवाही क्विनॉलफॉस १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||