रिलायन्स फाउंडेशन व विस्तार शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपुर यांच्या सल्ल्यानुसार लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गोवर्गीय व म्हैसवर्गीय पशुधनामध्ये दिसुन येत आहे. या रोगाचा प्रसार डास,गोमाशी आणि गोचीड यांच्याद्वारे होतो. आजाराची लक्षणे या रोगामध्ये दोन ते तीन दिवसासाठी मध्यम तिव्रेतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावर सर्वत्र कडक घट्ट गोलाकार फोडी येतात. अशक्तपणा येणे, चारा न खाणे लसीका ग्रंथी मध्ये सूज येणे, पायाला सूज येणे ,पोळीला सूज येणे ,दूध उत्पादन कमी होणे,गाभडणे, जनावरामध्ये वंध्यत्व येणे आणि मरतुक होणे याप्रमाणे आहेत. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||