रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ.राजेंद्र जाने,निवृत्त किटकक्षात्रज्ञ,यांच्या सल्ल्यानुसार कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रनासाठी एकात्मिक उपाय. सध्या कपाशी शेतात गुलाबी बोंड अळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. शेतात पिवळे व निळे चिकट सापळे (१.५ x १.० फूट) प्रत्येकी ६-८ सापळे प्रति एकर क्षेत्रात पीकाच्या एक फुट उंचीवर लावावे. पक्ष्यांना बसण्यासाठी २५ पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारावे. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टिपून खातील. गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी २ कामगंध सापळे आणि पतंगाना सामूहिकरित्या आकर्षित करण्यासाठी ८ सापळे प्रति एकरी लावावेत. पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्काची अथवा निंबोळी तेल १०० मि.ली. अधिक १० ग्रॉम धुण्याची पावडर किंवा अझाडिरॅक्टीन ३०० पी.पी.एम. ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रासायनिक नियंत्रनासाठी उपाय सांगा-गुलाबी बोंडअळी लेबलक्लेम नियंत्रणामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी २५ मि.ली. किंवा क्विनलफॉस २० टक्के एएफ २५ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी ३० मि.ली किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्युपी २० ग्रॉम किंवा इन्डॉक्झाकार्ब १४.५ टक्के एससी ५ मि.ली.किंवा इमामेक्टिन,बेन्झोएट ५ टक्के एस.जी.५ ग्रॉम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.