रिलायन्स फाऊंडेशन आणि पशुसंवर्धन आयुक्त,महाराष्ट्र राज्य,यांच्या सयुक्त विद्यमाने पशूपालकांना सल्ला दुधाळ जंनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाची लक्षणे याबाबत माहिती सांगा लम्पी त्वचा रोगामध्ये जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषत: डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात, तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत,फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. पायास सूज येते ,जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यामध्ये जखमा तयार होतात.या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. लम्पी त्वचा रोगाचा प्रसार कसा होतो-बाह्य किटकाद्वारे(डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य किटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. प्रतिबंधत्मिक उपाय काय करावे-बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २.३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉईल २ टक्के यांचा वापर करता येईल.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.