रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ.राजेंद्र जाने,निवृत्त किटकक्षात्रज्ञ,यांच्या सल्ल्यानुसार कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रनासाठी उपाय. कापुस पिकावरील शेंदरी बोंड अळीचे रासायनिक नियंत्रनासाठी दिलेल्या अळी व अंडी नाशक कीटक नाशक पैकी कोणतेही एकच फवारणी करावी. पहिला पर्याय ज्यामध्ये प्रोफिनोफाँस ५० टक्के ईसी २५ मि.ली. अधिक टेबुकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूडीजी वापरावे. दूसरा पर्याय याप्रमाणे एमॅमेक्टिन बेंझोएट 5 टक्के अधिक डायफेन्युरॉन ४० टक्के अधिक स्पिनेटोराम ५५ टक्के अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन ५ टक्के डब्लू.जी.(संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॉम किंवा तिसरा पर्याय संयुक्त किटकनाशक क्लोरटॅनिलप्रोल टक्के अधिक लॅम्बडासीहॅलोथ्रिन ५ टक्के २.५ मि.ली. अधिक टेबुकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूडीजी किंवा पायराक्लोस्त्रोबीन २० टक्के डब्ल्यू.जी. १० ग्रॉम. सर्व पर्यायसोबत ००:५२:३४ हे १०० ग्रॉम सोबत प्लानोफिक्स ४.५ मि.ली.( फुल, पाते व बोंड गळ थांबविण्यासाठी) घेऊन फवारणी करावी. वरील किटकनाशकाचे प्रमाण १२-१५ लिटर पाण्यासाठी असून ते साध्या पंपासाठी आहे पावर स्प्रे फवारणी पंपासाठी वर दर्शविलेल्या कीटकनाशकांची मात्रा अडीच ते तीन पटीने वाढवावी. धन्यवाद!
Dhule, Jalagaon
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved.