रिलायन्स फाऊंडेशन प्रस्तुत डॉ. जे. ॲनी शिबा केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सल्ल्यानुसार कृषी सल्ला
सध्याच्या कालावधीत बीटी कपाशी वाणावर लालसर डाग विकृती दिसून येते. फुलोऱ्यापासून ते बोंडे धरण्याच्या कालावधीत झाडांना भरपूर अन्नद्रव्यांची गरज असते. जमिनीत ओलावा कमी असल्यास पाण्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. परिणामी झाडातील हरितद्रव्य कमी होऊन पानांमध्ये लाल रंगाचे घटक निर्माण होतात. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडतात. यालाच लालसर डाग विकृती म्हणतात. शेतकरी याला "लाल्या" असे म्हणतात.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||