रिलायंस फाउंडेशन प्रस्तुत. प्रा.राजेंद्र जाणे, निवृत्त कृषि शास्त्रज्ञ,अमरावती यांच्या सल्यानुसार. सध्या सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. उंट अळीचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे, त्यासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 7 मि.लि. किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन 4.9 टक्के प्रवाही 6 मि.लि. यापैकी कुठल्याही कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाणी याप्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||