रिलायन्स फाउंडेशन आणि विस्तार कृषी विद्यावेता,प्रशिक्षण व भेट योजना, कृषी महाविद्यालय नागपूर मामाजी:हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो व याच्या व्यवस्थापनबाबत माहिती सांगा. बेटा:हरभरा पिकावर मर रोग जमिनीत वास्तव्य असलेल्या फ्युजेरीयम बुरशीमुळे होतो.मर रोगामुळे पाने पिवळी पडून शेंडे मलूल होऊन झाड हिरव्या अवस्थेत वाळते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रथम शेतातील प्रादुर्भावग्रस्त झाड उपटून शेताबाहेर नष्ट करावे. प्रादुर्भावग्रस्त पिकाला ओलीत करण्यापूर्वी प्रथम बुरशीनाशकाची ड्रेचिंग करावी व नंतरच ओलीत द्यावे.ओलीत करतांना काय काळजी घ्यावी व त्यानंतरची उपाय सांगा:हरभरा पिकाला हलकेच ओलीत द्यावे.जास्त पाणी देऊ नये.प्रादुर्भावग्रस्त झाडाभोवती कार्बन्डेझीम १० ग्रॉम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॉम प्रती १० लीटर पाणी किंवा जैविक ट्रायकोडर्मा बुरशी १ लिटर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर ड्रेचिंग करावे.प्रभावी नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.