रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ. राजेंद्र जाणे,किटक शात्रज्ञ,यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषी संदेश या प्रमाणे:हरभरा पिकात घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एकरी १० पक्षी थांबे उभारावे. सुरवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रभावी जैविक नियंत्रणासाठी HNPV विषाणू चा फवारा प्रति हेक्टरी ५०० विषाणू ग्रस्त अळ्यांचा अर्क ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर (१० ते २० अळ्या प्रती १० झाडे) इमामेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॉम किंवा क्लोरॅनट्रीनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के इसी १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद!
Comment | Author | Date |
---|---|---|
Be the first to post a comment... |
Copyright © 2025 Reliance Foundation. All Rights Reserved.