टंचाईच्या काळात डीएपी (DAP) ऐवजी खतांचा पर्यायी पर्याय

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन, यांच्या सयुक्त विद्यमाने, महत्त्वाचा संदेश, खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होत असताना डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, डीएपीचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. डीएपीला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), ट्रिपल सुपर फॉस्फेट (टीएसपी), तसेच एनपीके १०:२६:२६, २०:२०:०:१३, १२:३२:१६ आणि १५:१५:१५ यांसारख्या संयुक्त खतांचा वापर करता येतो. एसएसपीमुळे स्फुरदाबरोबर सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात, तर संयुक्त खतांमुळे नत्र, स्फुरद व पालाश संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. धन्यवाद..!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags