रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मच्छीमार बांधवांना संदेश, INCOIS च्या माहितीनुसार, जून महिन्यात प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागात एल निनो परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. यामुळे हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान वाढू शकते, समुद्रात उष्णतेच्या लाटांचा (Marine Heatwave) धोका वाढू शकतो आणि सागरी पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. या बदलांमुळे माशांचे स्थलांतर, मासेमारीचे प्रमाण आणि समुद्राची परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे समुद्रात जाण्यापूर्वी महासागराच्या स्थितीचा अंदाज (OSF) आणि हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासा, त्यानुसार मासेमारीचे नियोजन करा आणि सर्व सुरक्षा सूचनांचे पालन करा. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||