रिलायन्स फाउंडेशन प्रस्तुत संदेश
प्रिय मच्छीमार बांधवांनो,
सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मालवण-सिंधुदुर्ग आणि वैद्यकीय विभागाकडून महत्त्वाची सूचना.
पावसाळ्यात वापरात नसलेल्या नौकांमध्ये पाणी साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारखे आजार पसरवणाऱ्या डासांची पैदास होऊ शकते.
यासाठी खालील सोप्या उपायांचे पालन करा:
वापरात नसलेल्या नौका व्यवस्थित झाकून ठेवा, जेणेकरून त्यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही.
नौकेत पाणी साचल्यास ते दर आठवड्याला काढून टाका.
पाणी काढणे शक्य नसल्यास दर आठवड्याला टेमिफॉस अळीनाशकाचा वापर करा.
आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन या सूचनांचे पालन करा. तसेच, ही माहिती इतर नौकामालक आणि मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवा.
धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||