रिलायन्स फाऊंडेशन आणि मत्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी, यांच्या वतीने, मासेमार बंधुंसाठी माहिती, समुद्रात मासेमारीसाठी जाताना चक्रीवादळाचे वारे, प्रतिकूल हवामान आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये बचाव करण्यासाठी योग्य सुरक्षा साहित्य बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक बोटीमध्ये खलाश्यांच्या संख्येनुसार लाईफ जॅकेट व लाईफ बोया असणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, जर बोटीत ६ जण प्रवास करत असतील, तर किमान ६ लाईफ जॅकेट असणे आवश्यक आहे. लाईफ जॅकेट एखाद्या व्यक्तीला ३६ तासांपर्यंत पाण्यावर तरंगत ठेवण्यासाठी डिझाइन केलेले असतात, अगदी त्या व्यक्तीला पोहता येत नसेल तरीही. ही जॅकेट चमकदार आणि स्पष्ट दिसणाऱ्या रंगांत उपलब्ध असल्यामुळे पाण्यातून सहजपणे दिसून येतात. रात्रीच्या वेळी इतर बोटींचा प्रकाश पडल्यास लाईफ जॅकेटवरील परावर्तित (रिफ्लेक्टिव्ह) स्टिकर्स चमकतात, ज्यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यास मदत होते. धन्यवाद
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||