रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ. जयप्पा कोळी, प्राध्यापक, मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी,यांच्या वतीने, मासेमार बंधुंसाठी माहिती, माशांचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने बर्फ लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशे आणि बर्फ यांचे प्रमाण साधारण १:१ ठेवावे. माशांना थंड ठेवण्यासाठी स्वच्छ आणि बारीक चुरा केलेला बर्फ वापरावा. कंटेनरमध्ये माशांच्या खाली, मधे आणि वर बर्फाचे थर लावावेत. यामुळे माशांचे तापमान ० ते २°C पर्यंत राखले जाते. बर्फाचे मोठे तुकडे वापरू नयेत, कारण त्यामुळे माशांना नुकसान होऊ शकते. माशांच्या संपर्कात जितका जास्त बर्फ असेल तितके मासे लवकर थंड होतात. अशा पद्धतीने बर्फ लावल्यास साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान मासे अधिक काळ ताजे राहतात. धन्यवाद…!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||