कपाशी पिकावरील रसशोषक किडींचे नियंत्रण 

रिलायन्स फाऊंडेशन आणि डॉ. राजेंद्र जाने, निवृत्त कृषी तज्ञ, यांच्या सल्ल्यानुसार सध्याच्या स्थितीत कपाशी पिकावर रसशोषक तुडतुडे किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आहे. त्यामुळे पाने खालच्या बाजूने वळत आहे. पानाच्या मागे निरीक्षण करावे. प्रती पान २ ते ३ हिरवे तुडतुडे दिसून येताच. रसशोषक तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी थायोमेथॉकझ्याम २५ डब्लूजी ४ ग्रॉम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ५ मि.ली. किंवा एसीटामिप्रिड २० एसेसपी ४ ग्रॉम किंवा इथिऑन ५० टक्के ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत सुक्ष्म अन्नद्रव्ये, १९:१९:१९ वापरावे तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशक आवश्य घ्यावे सोबत निंबोळी अर्क पण वापरावा. धन्यवाद!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags