कपाशी पिकामध्ये आकस्मिक मर व्यवस्थापन 

रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या सयुक्त विद्यमाने कृषी सल्ला, कपाशी पिकामध्ये आकस्मिक मर व्यवस्थापन कसे करावे: बेटा कपाशी शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.लवकरात लवकर २०० ग्रॉम युरिया अधिक १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॉम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मि.ली. याप्रमाणे आळवणी करावी. किंवा पर्यायी व्यवस्थापणामध्ये १ किलो १३:००:४५ अधिक  २ ग्रॉम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॉम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मि.ली. आळवणी करावी. अधिक नुकसान टाळण्यसाठी काय करावे-आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.उपरोक्त उपाय लक्षणे दिसताच करावी,जेणेकरून पुढील होणारे पिकाचे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.धन्यवाद! 

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags