रिलायन्स फाउंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी, यांचे सल्ल्यानुसार, स्तनदहा आजार हा दुध देणाऱ्या जनावरांमध्ये मोठ्या आढळतो कासेला सूज येते. जनावरांना ताप येतो. कासेला हाताने स्पर्श केल्यास कास गरम व कडक जाणवते. सुजेमुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात. दुधाचा रंग आणि चव बदलते. उत्पादन कमी होते. कासेच्या वेदनेमुळे जनावरांची हालचाल मंदावते, खाणे कमी होते. प्रतिबंधात्मक उपायदूध काढण्याअगो:दर व दूध काढल्यानंतर जंतूनाशक द्रावणाने दूध काढण्याऱ्याचे हात व जनावरांची कास धुवावी.दूध काढण्याची जागा कोरडी असावी. कास धुतल्यानंतर स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावी.धार काढण्यापूर्वी व धार काढल्यानंतर जनावरांचे सड विशिष्ट प्रकारच्या द्रावणात (टिट डीप) बुडवावेत.धार काढल्यानंतर जनावरांना अर्धा ते पाऊण तास खाली बसू देऊ नये. यासाठी त्यांना चारा किंवा आंबवण खाण्यास द्यावे.उपचार पद्धती प्रतिजैवकांच्या उपचाराला जनावर प्रतिसाद देत नसल्यास बाधित दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून उपचारासाठी योग्य ते प्रतिजैवक निवडून उपचार करावेत. धन्यवाद
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||