जनावरात खनिज मिश्रणाचे महत्व

रिलायन्स फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्य सल्यानुसार जनावरात खनिज मिश्रणाचे महत्व दुधाळ जनावरात योग्य चयापचय कार्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तसेच चयापचय रोग जसे किटोसिस, दुग्धज्वर, हिमॅचुरीया यासारख्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी रोज 50 ते 100 ग्राम खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे. खनिज मिश्रणाचा आहारात समावेश केल्यामुळे गाई म्हशीतील उद्भवणाऱ्या वंधत्व व प्रजनन समस्याला आळा घालता येते.त्यामुळे दुधाळ व भाकड जनावरांना योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे खनिज मिश्रण देताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच देण्यात यावे.खनिज मिश्रणात अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे दुधाळ जनावरांचे दूध वाढण्यास मदत होते व जनावराची कार्यक्षमता व वेतातील अंतराचा कालावधी कमी होतो.धन्यवाद!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags